दहशतीची हवा काढली – पोलिसांनी गुन्हेगारांना रस्त्यावर धुळ चारली
येरवड्यात गुन्हेगारांची दिंड – पोलिसांचा कडक इशारा
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१२, पुणे :
येरवडा गणेशनगर परिसरात हत्यारासह दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलिसांनी शेवटी गजाआड करून त्यांच्या माजाला चाप लावला. दिनांक 05 ऑगस्ट रोजी रात्री चा सुमारास हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या सात आरोपींवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाच विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल न्यायालयात तर उर्वरित दोन आरोपींना ताब्यात घेऊन घटनास्थळीच त्यांच्या दिंडीची मिरवणूक ही दिनांक १ १ ऑगस्ट रोजी काढण्यात आली. परिसरात टेहळणी करत फिरवून पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला. “येरवड्यात दहशत माजवली तर थेट पोलिसी परेडच वाट्याला येईल!” स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे स्वागत करत “अशा टोळ्यांना आता जाग्यावरच धडा शिकवावा” अशी मागणी केली. परिसरात तणाव असला तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. पुढील तपास येरवडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे करत आहे.