दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी
मानव सेवा प्रतिष्ठानने ताज हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांचा केला सत्कार
अक्षराज : विनोद वास्कर
दि.११, शिळफाटा (ठाणे) :
शिळफाटा जंक्शन नाक्यावरून मानव सेवा प्रतिष्ठान तर्फे दहावी व बारावीचे २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मेजवानीसाठी हॉटेल ताज ग्रँड मुंबई येथे लक्झरी बसणे ट्रिप घेऊन गेले. गुणवत्ता विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मेजवानी मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ९० टक्के मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा ताज हॉटेलमध्ये सत्कार करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गेट ऑफ इंडिया येथे घेऊन गेले. विद्यार्थ्यांनी या ट्रिपमध्ये खूप एन्जॉय केला. मानव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल आलिमकर यांनी २६ जानेवारी २०२५ रोजी हाशा रामा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन हा साजरा होत होता. त्यावेळी सुनिल आलिमकर हे भाषण करत होते त्यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन आणि मनोबल वाढवावे तसेच विद्यार्थ्यांची टक्केवारीची गुणवत्ता वाढवावी. यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी ९० टक्के मार्क मिळवतील त्या विद्यार्थ्यांना हॉटेल ताजमध्ये मेजवानी देण्यात येणार आहे. असे भाषणात सांगण्यात आले होते. आज ते आपल्याला पूर्ण करताना दिसले आहे. या अगोदर सुद्धा विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास करण्याची त्यांनी संधी दिली होती.