दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांचे ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांना सडेतोड उत्तर
रोहिदास मुंडे यांनी मा.जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यावर केली होती टीका…
अक्षराज : विनोद वास्कर
दि. १८, दिवा (ठाणे) : दिव्यातील सेटलमेंट बादशाह हा खाव बुजाव रोहिदास मुंडे यांनी काल आमच्या जिल्हाध्यक्षांवर टीका केलेली आहे. आता रोहिदास मुंडे म्हणजे कोण रोहिदास मुंडे म्हणजेच सेटलमेंट बादशहा, दिव्यात छोटे-मोठे मुद्दे उचलतो.आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचे सेटलमेंट करून आपलं घर चालवण्याचं काम करतो असा हा रोहिदास मुंडे. हाच रोहिदास मुंडे भारतीय जनता पार्टीचा जुना सहकारी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आणि अनेक वर्ष काम केलेलं आहे. तरी देखील भारतीय जनता पार्टीला कधी कळलेलीच नाही.
भारतीय जनता पार्टीचे रचना ही प्रत्येक तीन वर्षांनी बदली होत असते आणि रचना बदलताना ही रचना लोकशाही पद्धतीने बदलली जाते भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे ज्यांच्या लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवडला जातो आणि गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणूक प्रक्रियेचा जी रचना आहे ती चालू आहे आणि त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्याची कामाची क्षमता आहे अशाच व्यक्तीला बसवलं जात. आणि ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात काम करायची संधी भेटते. जो जिल्ह्यात काम करतो त्याला प्रदेशावर काम करण्याची संधी भेटत असते. भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे ज्याच्यात लोकशाही पद्धतीने सर्व रचना बदलली जाते आणि इतर पक्षांसारखा आमच्या पक्षांमध्ये ना हुकुमशाही चालत नाही. घराणेशाही चालत नाही. लोकशाही पद्धतीने सर्व रचना बदलून पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. मला सांगायचं हे आहे की रोहिदास मुंडे हा जो सेटलमेंट बादशाह आहे त्यांनी त्यांच्या कुवतेनुसार वक्तव्य करायला हवं. तुम्ही सध्याचा संजय वाघुले यांचा इतिहास पाहिला तर मागे देखील संजय वाघुले साहेब एकदा जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत. मागच्या चार ते पाच ट्रम्प मध्ये नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापती, गटनेता असे अनेक मोठी पदे भूषवलेली आहेत. तरी देखील त्यांचे पाय जमिनीवर आहेत ग्राउंड लेव्हलला काम करून कार्यकर्त्यांच्या मध्ये राहून पक्ष संघटनेचे काम ते करत आहेत.

ठाण्यापासून ते दिव्या पर्यंत त्यांनी मागील दीड वर्षात खूप चांगलं काम केलेलं आहे.आणि आत्ताच झाली लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कोकण पदवीधर मतदारसंघ असेल तर ठाणे जिल्ह्याचा जर आपण रिझल्ट पाहिला तर आपल्याला समजेल त्यांनी काय काम केलेलं आहे. सचिन भोईर म्हणाले माझे रोहिदास मुंडेंना इतकाच सांगणं आहे की आपल्या कुवतेनुसार वक्तव्य करा अन्यथा भारतीय जनता पार्टी जनता पार्टी काय आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी काय आहे हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ असे शिळ दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी प्रतिक्रिया दिली.