धक्कादायक ! बापानेच स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार…
शिळ-डायघर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
अक्षराज : विनोद वास्कर
दि. १५, शिळफाटा (ठाणे) : शिळ-डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कल्याण फाटा परिसरातील अभयनगर मध्ये असलेल्या अभयनगर चाळ, पोस्ट पडले, ता.जि.ठाणे या ठिकाणी बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या पोटच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मुलीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्यामुळे ती गर्भवती राहून तिची प्रसुती झाली म्हणून शिळ-डायघर पोलीस स्टेशन मध्ये बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने फिर्याद नोंदवली आहे.

आरोपी महेश रामसुंदर जयस्वाल (मुलीचा बाप) ३ ऑगस्ट २०२४ पासून तो ३ एप्रिल २०२५ पर्यंत अभयनगर मध्ये असलेल्या चाळ मध्ये राहत्या घराच्या किचनमध्ये मुलीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध करीत होता. म्हणजेच ९ महिने तिच्यावर तो अत्याचार करत होता. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर शिळ -डायघर पोलीस स्टेशन, ठाणे मध्ये आरोपीवर गुन्हा रजि. न. कलम ३७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१), ६८ (अ), ६४(२) (एफ), बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ प्रमाणे कलम लावण्यात आले आहे. दाखल अधिकारी, तपासी अधिकारी सपोनि/ प्रशांत खरात, ( शिळ डायघर पोलीस स्टेशन )यांच्याकडे सध्याही केस आहे. भेट देणारे अधिकारी वपोनि/संदिपान शिंदे, पोनि/गुन्हे जयंत राजूरकर, पोनि/प्रशांत खरात या सर्वांनी ५ एप्रिल २०२५रोजी रात्री १२:२०वा घटनास्थळी भेट दिली.
कल्याण फाटा, पडले, डायघर, शिळ फाटा, खार्डी, देसाई, खिडकाळी, फडके पाडा, शिळ ठाकूरपाडा, भोलेनाथ नगर, या सर्व परिसरातील नागरिक प्रशासन कडे मागणी करत आहेत. आरोपीवर कठोर ते कोठार शिक्षा करण्यात यावी. जेणेकरून पुन्हा या परिसरामध्ये अशी घटना घडणार नाही. हा खटला फास्टट्रॅक वर चालवण्यात यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे. समाजामध्ये अशा नराधम बापाला जगण्याचा अधिकार नाही. माणुसकीपणाला लाज वाटावी, मन स्तब्ध करणारी मानवतेला लज्जा वाटेल अशी घृणास्पद घटना आहे.