पानगांवात भरला हजारों वैष्णवांचा मेळा !
मराठवाडयातील प्रति पंढरपुर पानगांवात उसळला भाविक भक्तांचा महापुर
अक्षराज : उमेश जोशी
दि.०७, पानगाव (लातूर) : मराठवाड्यात प्रति पंढरपुर म्हणुन ओळख आसलेल्या रेणापुर तालुक्यातील पानगांव येथे हेमाडपंथी विठठल-रुक्मीनी मंदीर असून दरवर्षी आषाढी एकादशी निमित परिसरातील विठ्ठलभक्त वेगवेगळ्या दिंड्या पांडूरंगाचा गजर करित पांडूरंगाच्या चरणी लीन झाल्या असुन ज्यांना पंढरपुर जाणे शक्य झाले नाही असे हजारों वारकरी,वैष्णवांनी गर्दी केल्याने पानगांवात भाविक भक्तांचा जणु महापुरच लोटल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दरवर्षा प्रमाणे आषाढी एकादशी निमित आदल्या दिवशी शनिवार (दि.५ ) रोजी लातुर येथुन कामखेडा येथील हरी भक्त माले आणि गुडे परिवाराच्या वतीने ९ लाख ५१ हजारांचा माऊलीचा रथ आणि योगीराज सिरसाट,गोकुळ राठोड,ग.भा.वेणुबाई बडे यांनी रथात १ लाख ६० हजार रुपयांच्या दिड किलो चांदीच्या माऊंलीच्या पादुका अर्पन केलेल्या रथासह तसेच भगीरथ लाहोटी यांच्या स्मरणार्थ मुरुडच्या सुषमा चांडक यांनी दिलेल्या पालखी सह शेकडो अबाल वृद्ध पायी दिंडी घेवुन रात्री आठ वाजता पानगांवांत दाखल झाले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदीरात सकाळी ब्रम्हृवृंद दिलीपदेव पाठक यांच्या वेद व मंत्रोचारात रेणापुरच्या दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. यावेळी मंदीर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘विठ्ठल-विठ्ठल विठ्ठला-पांडूरंग विठ्ठला… ग्यानबा-तुकाराम… हरी नामाचा गजर करीत पानगाव आणि परिसरातून अनेक गावो गावच्या दिंड्या येत होत्या त्यांच्या दिंडीचे पूजन,सत्कार,मंदीर समितीच्या वतीने करण्यात येत होते. मंदिर परिसरात चिमुकल्यासह वयोवृद्धांनी पावले खेळत फुगडीचा आनंद लुटला. यानिमित्त मंदीर परिसरात लागणाऱ्या दुकानांच्या जागेची व्यवस्था करण्यात आली होती. गावा गावातुन पायी येणाऱ्या दिंडीतील भक्तांच्या दर्शनासाठीची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.पाऊसापासुन बचाव व्हावा म्हणुन दर्शन रांगेवर वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला होता.
दैनिक अक्षराज ०७ जुलै २०२५
पेपर येथे वाचा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/245/daily-aksharaj-07-july-2025#
मंदिर समिती आणि अनेक वैयक्तीक हरी भक्तां कडून दर्शना करिता येणाऱ्यां भावीक भक्तांची फराळ म्हणुन साबुदाना खिचडी, केळी आणि पिण्याच्या शुध्द पाण्याची मोफत दिवसभर व्यवस्था केली गेली होती. मंदिरामध्ये फुलाचे डेकोरेशन तसेच मंदिरावर लाइटिंग व्यवस्था,पाणी व्यवस्था करून ठेवली होती.लातुर आणि अहमदपुर येथील ब्लड बॅकच्या वतीने रक्तदान संकलन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

दिवसभर पांडूरंगाच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी वाढतच जात होती. लातुर, बीड जिल्ह्यातुन भावीक भक्त विठ्ठल नामाचा गजर येत आसल्याने दर्शनाकरिता भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गर्दी वाढणार हे ओळखुन मंदीर समिती आणि गावकरी मंडळीनी भक्तांची कसलीही गैरसोय होणार नाही, याकरिता वेग वेगळ्या समित्या गठीत केल्या होत्या. तर रेणापुर पोलीस स्टेशनचे पो.नि.दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनात पानगांव पोलीस दूरक्षेत्राच्या स.पो.उ.नि.श्रीधर कांदे, पोहेंका नामदेव सारोळे, राजेंद्र घोगरे, परमेश्वर शेळगे यांच्या देखरेखी खाली महिला-पुरुष १६ पोलीस शिपाई, होमगार्ड यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्या करिता मंदीर समितीच्या पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
येथे असलेल्या १२ व्या शतकातील हेमाडपंथी विठ्ठल रुक्मीनी मंदीराची प्रतिपंढरपुर म्हणुन झाल्याने नमो तिर्थ विकास योजने अंतर्गत या मंदीराची निवड झाल्याने या मंदीराच्या जिर्णोदारा करिता ९ कोटी ५० लाख रुपयाचा निधी मंदीर समिताला मिळाल्याने मंदीराचे पाडकाम करण्यात आल्याने यावर्षी आलेल्या भाविक भक्तांची विठठल-रुक्मीनी च्या प्रतिमांची इतरत्र व्यवस्था करून दर्शनाची सोय करण्यात आल्यामुळे मंदीर समिती आणि गावकऱ्यांना भक्तांच्या दर्शना करिता विशेष परिश्रम करावे लागले.
रामवाडी, मुसळेवाडी, फावडेवाडी, गोविंदनगर, चुकारवाडी, भंडारवाडी, सारोळा, बाभळगांव, खंडोबा गल्ली, निरपणा, नरवटवाडी, गोपाळवाडी, यशवंतवाडी, मुरढव सह इतर गांवाच्या शेकडो महिला पुरुष पायी पायी दिंड्या घेवुन येत विठु-रखमाईचा जागर करीत हरीच्या चरणी लीन झाल्या होत्या.