पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी

Spread the love

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी…
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.३०, येरवडा (पुणे) :
येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील दोन तरुणांवर पोलीस मार्शलांनी अमानुष मारहाण केल्याची घटना दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजीच्या रात्री उशिरा घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण केल्याने दोघांचे हात फॅक्चर झाले आहेत. पीडित तरुण व त्यांचे कुटुंब आणि स्थानिक नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, परंतु त्यांची दखल घेण्यात आली नाही. उलट PSI यांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना पळवून लावल्याचा गंभीर आरोप आहे. नागरिक असा ठाम संशय व्यक्त करतात की, मारहाण करणारे पोलीस मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते.

यापूर्वी राज-चौक भागात एका नागरिकाला लहान मुलगा पाठीवर असताना कारण न सांगता पोलीसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मारहाण केलेल्या तरुणाच्या बायकोला फोन करून दिलगिरी व्यक्त केली होती. कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ पुरावे मीडियाला मिळाले असून, नागरिकांचा ठाम आग्रह आहे की यापूर्वी घडलेल्या घटनांचा तपशीलही आयुक्तांना मीडियाद्वारे द्यावा. आयुक्तांनी तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!