बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे आज पटरीवर धावली…
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा
अक्षराज : शिवाजी औसेकर
दि. १८, बीड : गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्व.गोपीनाथरावजी मुंडे , स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्यासह आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी अतोनात परिश्रम घेऊन अखेर बीड जिल्हा वासियांचे स्वप्न पूर्ण केले. आज अहिल्यानगर ते बीड रेल्वेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे, खा. रंजनीताई पाटील, आ. धनंजय मुंडे, आ. नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, आ. काळे माजी आ. भीमराव धोंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला.

यावेळी व्यासपीठावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या रेल्वे हा आवडीचा विषय होता असे म्हटले. तसेच आजचा दिवस हा दोन अर्थाने महत्त्वाचा आहे कारण 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिवस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पण जन्मदिवस आहे असे म्हटले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात सांगितले की धार्मिक आणि ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभलेली संतांची भूमी विकासाकडे वाटचाल करत आहे असे म्हटले. यावेळी भाषणात मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांनी रेल्वे आणण्यासाठी किती प्रयत्न केले याचा उल्लेख केला. तसेच खासदार रंजनीताई पाटील यांनी भाषणात बोलताना हि रेल्वे जलद गतीने मुंबईला पोहोचवा असे म्हटले. खा. सोनवणे यांनी भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांना रेल्वेची स्वप्नपूर्ती झाली आता पाणी देऊन दुष्काळमुक्त करा असे म्हटले.
जालना जळगांव रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार साहेब.