मिताली आंबेरकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित
अक्षराज : प्रतिनिधी
दि.०६, मुंबई : प्रेरणा प्रतिष्ठान व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मिताली मिलिंद आंबेरकर यांनी केलेल्या कार्याची दखल प्रेरणा प्रतिष्ठान व प्रेरणा नाट्य मंडळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली
आणि यावर्षीचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. तसेच मिलिंद प्रतिष्ठांच्या खजिनदार प्रणिता परशुराम गवंडे यांनाही यावर्षीचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. तसेच मिलिंद प्रतिष्ठानचे. सचिव सिद्धेश रमेश रावळ यांनाही यावर्षीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवक प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे, तसेच मिलिंद प्रतिष्ठानचे संचालकअखिलेश भगवान करंगुटकर यांनाही या वर्षीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवक प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे.

बदलापूर सोनवली येथील सत्कर्म आश्रमात हा पुरस्कार सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी प्रेरणा प्रतिष्ठान आणि प्रेरणा नाट्य मंडळ यांच्या वतीने सदर आश्रमातील मुलांसाठी मोफत मेडीकल तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणा प्रतिष्ठान आणि प्रेरणा रंगमंच संस्थापिका अध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी, सचिव वैभव कुलकर्णी, रोहन गावकर, अविनाश म्हात्रे, जितू गुप्ता, डॉ. पारुल लाड, दिव्या गावकर, डॉ.राहत शेख, दिलीप नारकर, शैलेश सनस, गुरुनाथ तिरपणकर, राजेश भांगे, रोहित महाले, राम घरत, मंगेश सावंत, रोहित महाले, गंधाली तिरपणकर, उर्मिला मॅडम, अन्वीजा कोंडापे, वंदना ठाकूर, संध्या कासारे, मिताली आंबेरकर, रंजना परब, ज्योती वाघ, संतोषी बांगर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच मिलिंद प्रतिष्ठान मार्फत वैष्णवी मिलिंद आंबेरकर आणि विघ्नेश मिलिंद आंबेरकर या दोन चिमुकल्यानी आजी वैशाली बच्चू आंबेरकर आणि आजोबा बच्चू मुकुंद आंबेरकर व आई-वडिलांकडून प्रेरित होऊन त्यांना मिळालेले खाऊचे पैसे साठवून सत्कर्म आश्रमातील मुलांना २७ टी-शर्ट विकत घेतले आणि मुलांना वाटण्यासाठी प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रेरणा वैभव कुलकर्णी आणि सचिव वैभव कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या या महान कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.