वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी तुंगत आरोग्य केंद्राची यंत्रणा सज्ज : डाॅ. मेघा गावडे
अक्षराज : विकास सरवळे
दि.०३, पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरात भरणार्या आषाढी यात्रोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्याचे काना कोपऱ्यातून येणारे विठ्ठल भक्तांना आरोग्य सेवा पुरविताना तालुका आरोग्य अधिकारी यांचे नियोजनात संपूर्ण तयारी करण्यात आलेली असुन पंढरपूर-मोहोळ पालखी महामार्गावर असलेल्या तुंगत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती याठिकाणच्या वैद्यकीय अधिकारी मेघा भानुसे (गावडे) यांनी दिली.
राज्याची अध्यात्मिक राजधानी अशी ओळख असलेल्या पंढरीत वर्षातुन भरणारे प्रमुख चार यात्रांपैकी सर्वात मोठी आषाढी यात्रा असते यामध्ये सहभागी होणेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. पंढरीत येणारे भाविक हे पायी चालत मोठ्या भक्ती भावाने येतात त्यांना मुलभुत सुविधा पुरविताना जिल्हा प्रशासनाने काटेकोर नियोजन केलेले असुन यामध्ये महत्त्वपूर्ण भुमिका असलेल्या आरोग्य विभागानेही नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली असुन तुंगत आरोग्य केंद्र अंतर्गत

वैद्यकीय अधिकारी मेघा भानुसे (गावडे) (मेडीकल ऑफीसर ग्रेड-अ) यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. एकनाथ बोधले यांचे मार्गदर्शनातून आषाढी यात्रा राज्यासह पार्श्वभूमीवर तुंगत प्राथमिक आरोग्य केंद्रातील 13 गावातुन, तुंगत, भटुंबरे, नारायण चिंचोलीसह इतर कंटेनर सर्व्हेक्षण (2 राऊंड), पाणी शुद्धीकरण, धुर फवारणी, हॉटेल तपासणी ही आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत चालु ठेवलेली आहे.
दैनिक अक्षराज ०३ जुलै २०२५
पेपर येथे वाचा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/241/daily-aksharaj-03-july-2025#
भावीकांना औषध उपचार मिळण्यासाठी आरोग्य बुथ उभारण्यात आले आहेत. तुंगत बस स्टॉप अणि चिंचोली भोसे, शेगाव दुमाला येथे नियोजीत बुथचे माध्यमातून आरोग्य तपासणी आणि प्राथमिक औषधोपचार भाविकांना पुरविण्यात येत असुन तुंगत ग्रामपंचायतीचेवतीने औषध मदत मिळाली आहे. यासह दैनंदिन रुग्ण तपासणी प्रा.आ.केंद्र तुंगत येथे सुरूच असुन याठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया माहे एप्रिल पासुन दर गुरुवारी होते. तसेच प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत दर महिन्याच्या ९ तारखेला गरोदर माता तपासणी होते. तुंगत अंतर्गत प्रसुती सेवा दिली जाते -रोजच्या नवीन सेवेतुन गोरगरीबांना योग्य सेवा पुरवली जात असल्याचे डाॅ. सौ. गावडे यांनी सांगितले.
आषाढी यात्रोत्सव सोहळ्यात सहभागी होणार्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी पंढरपुर
आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य सेवा पुरवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांवर जबाबदार्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्यातील वारकर्यांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.
- डाॅ.मेघा गावडे (वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, तुंगत ता.पंढरपुर)