वाहन तोडफोड फरार आरोपी आखिर अटक !
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१५, येरवडा (पुणे) : लक्ष्मीनगर येरवडा परिसरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या १२-१४ वाहनांची धारदार कोयता शस्त्राने तोडफोड करून, ‘मी भाई आहे,’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट -४ पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार लक्ष्मीनगर येरवडा येथील मातोश्री शाळा येथे हा प्रकार घडला होता. येरवडा डेक्कन कॉलेज परिसरात रात्रीच्या सुमारास अंगावरती काळ्या कलरची टी-शर्ट – व ग्रे कलर पॅन्ट डेक्कन कॉलेज रस्तालगत आरोपी डोलारे थांबला आहे. खात्रीशीर बातमी गुन्हे शाखा. युनिट ४ पोलीस अंमलदार राहुल परदेशी, देविदास वांढरे यांना मिळाली असताना.

डेक्कन कॉलेज या परिसरातून आरोपीला शिताफिने ताब्यात घेण्यात आले . सयाजी डोलारे वय (वय २०रा. सर्वे १२ पवार चाळ लक्ष्मी नगर येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी फिर्याद दिली होती. सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट ४ पथकाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली .