मुस्लिमांना ८ हजारात स्टॉल देऊन दिव्यातील शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?
शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडेंचा शिंदे गटाला टोला
अक्षराज :विनोद वास्कर
दि. २९, दिवा (ठाणे) : शिंदे गटाच्या शहरप्रमुखामार्फत दिवा शहरात दिवा महोत्सव सुरू असून येथे मुस्लिमांना ८ हजारात व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिणामी हिंदुत्वावरून उद्धव साहेबांवर टीका करणाऱ्या शिंदे गटाने ८ हजार रुपयात हिंदुत्व विकलं का ? असा सणसणीत टोला शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी लगावला आहे.
शिंदे गटाच्या भूमिकेवर आक्षेप घेताना रोहिदास मुंडे यांनी शिंदे गटाच्या दिवा शहरप्रमुखाच्या कृतीवर बोट ठेवले आहे. एकीकडे उद्धव साहेबांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरणारे शिंदे गट स्वतः मात्र दिवा महोत्सव मध्ये पैशांसाठी मुस्लिम व्यवसायिकांना संधी उपलब्ध करून देतात यांनी केलं तर ते चालतं मात्र उद्धव साहेबांनी माणूसकीच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मांना समान वागणूक दिली तर मात्र ते उद्धव साहेबांवर हिंदुत्व सोडण्याचा आरोप करतात. दुतोंडी भूमिका असणाऱ्या शिंदे गटाचा बुरखा दिवा महोत्सव मधील व्यावसायिक गाळे मुस्लिम व्यक्तींना आठ हजारात दिल्याने फाटला गेला असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.