शिवपाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी बाभुळवाड्यात भव्य शिवार फेरी

Spread the love

शिवपाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी बाभुळवाड्यात भव्य शिवार फेरी

रोड मॉडेल व्हिलेजच्या माध्यमातून राज्यात स्मार्ट व्हिलेजेस उभी होतील – शरद पवळे

अक्षराज : राजकुमार इकडे

दि.२७, सुपा (अहिल्यानगर) : बाकुळवाडे गावच्या राज्यातील पहिल्या ग्रामसभेच्या रोड मॉडेल व्हिलेजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळच्या माध्यमातून बाभुळवाडे गावात शिव पाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी गावात भव्य शिवार फेरी काढण्यात आली. यावेळी बाभुळवाडे लोणीमावळा या शिवरस्त्याचे पुजन पारनेर भुमिअभिलेखचे उपअधिक्षक माधवराव पाटील यांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माधवराव पाटील यांनी ग्रामस्थांना जुलै महिन्यात गावातील सर्व शिव पाणंद शेतरस्त्यांचे रोव्हरद्वारे स्थळ परिक्षण करून हद्द निश्चित करण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. यावेळी जेष्ठ पत्रकार विनोद गोळे, महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे, शिरूरचे पत्रकार रविंद्रजी खुडे, शिरूर चळवळीचे विजय शेलार, सुरेश वाळके, सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके, तलाठी रविंद्र पवार, ग्रामविकास अधिकारी शेळके, संजय साबळे, भाऊसाहेब वाळूंज, दशरथ वाळूंज, बबन गुंड, विजय लाळगे, संतोष पाचर्णे तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उर्वरीत गावातील बाभुळवाडे ते ठाकरवाडी रस्ता, बाभुळवाडे ते आळकुटी रस्ता, बाभुळवाडे वडझिरे रस्ता आदी गाव नकाशावरील रस्त्यांची शिवार फेरीच्या माध्यमातून पाहणी केली गावातील उर्वरीत गावातील रस्ता प्रकरणांवर अधिकाऱ्यांसमवेत, समिती व ग्रामस्थ समन्वयातून सर्व प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यात गावाची ओळख निर्माण होवुन शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी ग्रामस्थांचा दळवळणाचा प्रश्न सुटणार असून उर्वरित रस्त्याची कामे लोकसहभाग श्रमादानातुन केली जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपसरपंच बाळासाहेब नवले, प्रमोद खणकर ग्रा.सदस्य बाभुळवाडे, निशिगंदा बोरुडे ग्रा.सदस्य, सविता जगदाळेग्रा. सदस्य, गुलाबराव नवले ग्रा. सदस्य, दिलीप बोरुडे मा.तंटामुक्ती अध्यक्ष,भिवाजी जगदाळे, डॉ. नितीन खणकर अध्यक्ष रोजगार निर्मिती विचार मंच महाराष्ट्र, दत्तात्रय जगदाळे,सचिन जगदाळे, भावका पटाडे आदींनी विशेष परिश्रम घेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!