श्रमजीवी कामगार संघटनेचा नवनिर्वाचित क.डों. म.पा आयुक्तांना इशारा…
अक्षराज : भानुदास गायकवाड
दि.२४, कल्याण (ठाणे) : दिनांक २३ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल आणि श्रमजीवी कामगार संघटना कार्याध्यक्ष सुलतान तसेच व संघटनेचे कल्याण युनिटचे कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. पालिकेच्या घनकचरा विभागातील नवीन ठेकेदार सुमित अल्को पास्ट कंपनीने सफाई कर्मचाऱ्यांची नवीन भरती न करता जुन्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे आयुक्त यांना सांगण्यात आले. तशी श्रमजीवी कामगार संघटनेचे सभासदांची लिस्ट ही देण्यात आली. तरी आयुक्तांनी मी ठेकेदाराला सांगून प्रयत्न करतो असे आश्वासन दिले. त्यावेळेस श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी सांगितले की, जर आमच्या सभासदांना कामावर घेतले नाही तर येणाऱ्या २५ तारखेला राज्य सफाई कामगार आयोगाचे स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने करू आम्ही आमचा हक्काचा लढा कायम पुढे ठेऊ.
असे संघटनेचे युनिट प्रमुख तसेच पदाधिकारी अमित साळवे, प्रविण बेटकर, नितीन काळण, सागर सोनावणे, दिनेश तरे, सचिन भाटकर, गौतम सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.