स्वर्गिय आ.साहेबराव बापू बारडकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
निजाम कालीन आठवणींना उजाळा…चाहत्यांची मोठी गर्दी
अक्षराज : साहेबराव गागलवाड
दि.११, मुदखेड (नांदेड ) : स्वातंत्र सेनानी तथा माजी आमदार स्वर्गीय साहेबराव देशमुख बारडकर यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून पंचक्रोशीतील चाहात्यांनी पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. निजामाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
बारड नगरीत स्वातंत्र सैनिक समारकात दिनांक 11 जुलै रोजी पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले. इंजिनीयर सुरेश देशमुख, माझी उपसभापती सुनील देशमुख, अँड संदीप देशमुख, यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोत्तावार यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बापूंच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकाचे इमोशन करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील उमरी बँक लूट, पाटनुर चा जंगल सत्याग्रह यांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील चहात्यांनी पुष्प अर्पण केले
साहेबराव बापू अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
(हे वाचले का ?) कठोर प्रशिक्षणानंतर १४८ जवान देशसेवेसाठी सज्ज ! 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://aksharaj.in/कठोर-प्रशिक्षणानंतर-१४८/
गुरुवर्य गंगाधर स्वामी यांनी विधी परंपरेनुसार अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी संचालक कैलास दाड, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, शहराध्यक्ष कैलास गोडसे, स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख, सरपंच प्रतिनिधी शिवाजी ब्रुडे, विलासराव देशमुख, प्रभाकर आठवले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख माणिक लोमटे उपसरपंच प्रदीप देशमुख, उत्तमराव लोमटे, आकाश सोनटक्के, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष, सतीश व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्य राहुल आठवले, गजानन कत्रे, सेवानिवृत्त वनाधिकारी किसनराव देशमुख, श्रीराम कोरे, नरसिंग आठवले, दशरथ आडे, उत्तम पवार, पंजाब राठोड, गजानन लोमटे, दिगंबर लखे, आनंदा पवार, सटवाजी पंडागळे, अशोक गव्हाणे, रामेश्वर कोरबैनवाड, प्रेमचंद सावरकर, अवधूत श्रीजिरे, गोविंद बने, गोविंद माळकोटे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.