उपजिल्हा रुग्णालयात दिले जाते उत्कृष्ट दर्जाचे जेवण
रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक होत आहेत समाधानी
अक्षराज : रमेश पंडित
दि.२६, हिमायतनगर (नांदेड) : हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गेल्या काही दिवसापासून उत्कृष्ट दर्जाचे पूर्ण आणि पोटभर पोषणमूल्य असलेले जेवण दिले जात असल्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून बोलले जात आहे. शासनाच्या निदर्शनाप्रमाणे रुग्णांना संतुलित आहार व नाश्ता देणे बंधनकारक असल्याप्रमाणे रुग्णालय प्रशासन व ठेकेदार याबाबत वेळोवेळी काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात सकाळच्या वेळी नाश्त्यासाठी उपमा, मटकी, चना देतात व जेवणामध्ये वरण-भात, भाजी-चपाती दिली जात आहे.

अनेक वेळा रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना सुद्धा जेवण दिले जात असल्याचे अशी रुग्णांच्या नातेवाईकांनी माहिती दिली आहे. विशेषता गर्भवती व बाळंतीण मातेसाठी शासनाने अंडी, दूध, ब्रेड, चिक्की देण्याचे निदर्श आहेत. म्हणून हे सर्व घटक आहारात पूर्णपणे दिले जाते. ठेकेदार शासनाच्या मेनू प्रमाणे आहार पुरवठा उत्कृष्ट दर्जाचे जेवण देऊन ठेकेदार व डॉक्टर रुग्णांना नेहमी सहकार्य करताना दिसून येत आहेत. यावर प्रशासनाचे नियंत्रण असल्याने ठेकेदार ही वेळोवेळी रुग्णांच्या आहाराची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.
दैनिक अक्षराज २७ जून २०२५
पेपर येथे वाचा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/235/daily-aksharaj-27-june-2025#