उद्या जवळबन येथे अश्वरिंगण सोहळा रंगणार
अक्षराज : शिवाजी औसेकर
दि.२७, केज (बीड) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संस्थान, नरसी (नामदेव) ता.कळमनुरी जि. हिंगोली यांच्या वतीने पायी दिंडी पालखी सोहळा आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे जात असून याचदरम्यान शनिवार, दिनांक 28 जून 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता अंबाजोगाई – कळंब मार्गावरील बोरीसावरगाव – पावनधाम मार्गे केज तालुक्यातील जवळबन येथे पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत नामदेव महाराज पालखीची विधिवत पूजा करून अश्व रिंगण सोहळा रंगणार आहे. दिंडीतील महाराजांचे गावात हनुमान मंदिरात कीर्तन संपन्न झाल्यावर उपस्थिती वारकरी व भाविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्व.निवृत्ती सोपान करपे यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या जवळबन गावात नामदेव महाराज पायी दिंडी पालखी व भव्य अश्वरिंगण सोहळ्याचे हे 30 वे वर्षे आहे. अश्व रिंगण, कीर्तन सोहळ्यात पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी, भाविकांनी उपस्थिती लावण्याचे आवाहन जवळबन ग्रामस्थ व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.