कठोर प्रशिक्षणानंतर १४८ जवान देशसेवेसाठी सज्ज !
धाडसी प्रात्यक्षिकाचे जवानांकडून प्रदर्शन !
अक्षराज : साहेबराव गागलवाड
दि.११, मुदखेड (नांदेड ) : मुदखेड शहरातील केंद्रीय रिझर्व पोलीस बल प्रशिक्षण विद्यालयात दि.११ जुलै रोजी दीक्षांत समारंभ तथा शपथ ग्रहण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या दीक्षांत समारंभात १४८ जवानांनी मूलभूत प्रशिक्षण घेतल्यानंतर देशाच्या विविध भागात सेवा देण्यासाठी समर्पित झाले आहेत. या समारंभाचे मुख्य अतिथी ख्वाजा सजनउद्दीन पोलीस महानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल हे होते व प्राचार्य सीटीसी मुदखेड यांनी परेडची मानवंदना घेतली.
दैनिक अक्षराज १२ जुलै २०२५
पेपर येथे वाचा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/250/daily-aksharaj-12-july-2025#
१७ मार्च २०२५ रोजी या जवानांचे प्रशिक्षण चालू झाले १६ आठवड्याच्या कठोर प्रशिक्षणाच्या नंतर दिनांक ११ जुलै रोजी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले, देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शारीरिक आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले, आधुनिक आणि मूलभूत सर्वोत्तम गुणवत्ताचे प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर हे जवान राष्ट्र सेवेला समर्पित झाले आहेत.

ख्वाजा सजनउद्दीन पोलीस महानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल यांनी आपल्या संभाषणात प्रशिक्षण पूर्ण करणांऱ्या जवानांना शुभेच्छा दिल्या. महानिरीक्षक यांनी कर्तव्य बजावत असताना जवानांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर भर दिला. प्रशिक्षणा दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी विविध प्रदर्शनाच्या माध्यमांतून आपले कौशल्य दाखविले. यावेळी केंद्रीय पोलीस बल प्रशिक्षण संस्था लातूर पोलीस महाउपनिरीक्षक अमीरूल हसन अन्सारी, सीटीसी मुदखेडचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी वेदप्रकाश त्रिपाठी, नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, भागातील प्रतिष्ठित नागरिक प्रशिक्षणार्थी जवानांचे माता पिता परिवारातील सदस्य, पत्रकार, शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.