अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक

Spread the love

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक

ओबीसींच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी संघटनेचे कार्य – खा. समीर भुजबळ

अक्षराज : वसंत रांधवण
दि.१२, अहिल्यानगर :
जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, भाबळेश्वर या तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आज शनिवार दि.१२ जुलै रोजी’संवाद आढावा बैठक’ नगर शहरात शासकीय विश्रामगृह येथे समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सखोल संवाद साधत, संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मते जाणून घेतली. ओबीसी समाजाच्या हक्कांच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी व संघटनेचे कार्य अधिक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक समता सैनिकाने जबाबदारीने आणि झोकून देऊन काम करण्याच्या सूचना दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती, संघटनात्मक सद्यस्थिती आणि आगामी दिशा यावर विचारमंथन झाले. ओबीसी आरक्षण, हक्कांचे संरक्षण आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे यावेळी समीर भुजबळ यांनी आवर्जून अधोरेखित केले.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, प्रदेश प्रचारक डॉ. नागेश गवळी, प्रा. संतोष विरकर, अंबादास गारुडकर, सुभाष लोंढे, प्रशांत शिंदे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब बोराटे, जालिंदर बोरुडे, वसंत रांधवण, बंडू कोथिंबीरे, खंडू भुकन, किसनराव रासकर,अनिल निकम, संजय डाके अर्जून मेहेत्रे, बबनराव घुमटकर, नवनाथ खामकर, रोहित पुंड, नवनाथ वाकळे, सुरेश थोरात, नानाभाऊ गाडीलकर, सुवर्णा धाडगे,गोरख आळेकर, प्रयाग लोंढे, धनंजय डहाळे, कल्याण अनारसे, रामदास हजारे, शरद मेहेत्रे यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील समता परिषदेचे पदाधिकारी, समर्पित समता परिषदेचे कार्यकर्ते आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!