भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली
कजरी महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न
अक्षराज : विनोद वास्कर
दि.११, दिवा (ठाणे) :
दिव्यात भारतीय जनता पार्टी कडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या भारत देशाच्या सीमेवरील जवानाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती.ग्लोबल शाळेपासून भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौक येथे समाप्ती झाली.तसेच कजरी महोत्सवानिमित्त संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम आयोजित करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवा शहरात ‘कजरी महोत्सव २०२५’ मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण पदवीधर आमदार निरंजन डाऊखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्रा, अभियान संघटक, महाराष्ट्र कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष (ठाणे शहर) संजय वाघुले, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर, दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, महिला आघाडीच्या अध्यक्षा सपना भगतश्री, रोशन भगत, दिलीप भोईर, समीर चौहान, जयदीप भोईर, श्रीधर पाटील आदी मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडी व प्रचार संघटनेतील जिलाजीत तिवारी, अशोक गुप्ता, गौरीशंकर पटवा, राकेश पांडे, राहुल साहू, राजेश सिंग, वीरेंद्र गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी दिवा शहर व परिसरातील विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कजरी गीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि उत्तर भारतीय संस्कृतीचे रंगतदार दर्शन दिवा शहरवासीयांनी अनुभवले.