हिमायतनगर बजरंग दलची कावड यात्रा भर पावसात जय श्री रामाच्या गजरात संपन्न
अक्षराज : प्रतिनिधी
दि.१८, हिमायतनगर (नांदेड) :
शहरातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षी दिनांक १८ ऑगस्ट रोजी श्रावणाच्या चौथ्या सोमवारी सहस्त्रकुंड ते हिमायतनगर पायी १५ किमी प्रवास करून हजारो कावडधाऱ्यानी जय श्री रामाचा जयघोष करत ही कावड यात्रा संपन्न केली या दरम्यान शहरातील ठिकठिकाणी कावड यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बजरंगीना फराळाचे वाटप करण्यात आले व श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून सर्व कावडधाऱ्यांना टी-शर्ट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून मागील १५ ते २० वर्षापासून कावड यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे. ही परंपरा जोपासत शहरातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या नवतरुण युवकांनी तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांना या कावडीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देऊन एक भव्य दिव्य प्रभू श्रीरामाची मूर्ती व जय श्रीरामाच्या जयघोषात सहस्त्रकुंड येथील कुंडाचे पाणी डोक्यावर घेऊन तेथून १५ कि.मी पायी प्रवास करत ते पाणी शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर महाराज यांच्या चरणी व नंतर आई-वडिलांचे त्या पाण्याने पाय धुवून आशीर्वाद घेण्याची परंपरा हिमायतनगर बजरंग दल ने शहरातील नव तरुणांना लावून दिली आहे. ती परंपरा जोपासत मागील १५ ते २० वर्षापासून शहरातील हजारो नवतरुण युवक दरवर्षी श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी या कावड यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रभू श्रीरामाचा जयघोष करत या कावड यात्रेमध्ये सहभागी होतात या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बजरंगी ना ठीक ठिकाणी गावातील प्रतिष्ठित मान्यवरांकडून फराळाचे व नाश्त्याचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून सर्व कवड धाऱ्याना टी-शर्ट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सुद्धा या कावड यात्रेस भेट देऊन सर्व बजरंगी ना श्रावणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शहरासह तालुक्यातील हजारो बजरंगी व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते या कावड यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.