पाटण सावंगीच्या ग्रामीण रुग्णालयाचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण
अक्षराज : दिवाकर घेर
दि.१८, नागपूर :
सावनेर तालुक्याच्या पाटणसांगवी येथील प्रतीक्षेत असलेल्या 30 खाटांच्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण दिनांक १८ ऑगस्ट रोजी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमालाव खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड, आरोग्य उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर, सरपंच रोशनी ठाकरे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार टेकचंद सावरकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आदी मान्यवर प्रामुख्याने मंचकावर उपस्थित होते.
सावनेर तालुक्यात शासकीय ग्रामीण रुग्णालय नव्हते. तसेच पाटणसावंगी परिसरात ग्रामीण आरोग्याची पाहिजे तेवढी सुविधा नव्हती. महामार्ग असल्याने वेळोवेळी अपघात झाला. अपघातग्रस्त नागरिकांना व इतर नागरिकांना थोडा कमी जास्त आरोग्याची गोष्ट आढळून आली तर नागपूरला जावं लागे. ही बाब शासनाच्या लक्षात आली व येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागी गरज असलेले ग्रामीण रुग्णालय मंजूर होऊन इमारत बांधकाम पूर्ण झाले. ११ वर्षे होऊन ही ग्रामीण रुग्णालय सुरु होतं नसल्याने चर्चा रंगू लागली. २०२० मध्ये कोरोनाने दहशत माजवली तेव्हा ग्रामीण रुग्णालय शोभेची वस्तू बनून त्रस्त लोकांना रडवत होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हा गाजला. निवडून येताच आमदार आशिष देशमुख यांनी पुढाकार घेऊन शासनाला वेळोवेळी योग्य पाठपुरावा केला. ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत काही कमतरता दिसल्याने शासनातर्फे १ कोटी २० लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून कमतरता भासलेले कामे करवून तात्काळ ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा घेतला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे फीत कापून लोकार्पण करुन झाले, फलकाचे ही उदघाट्न केले गेले, मंचावर उपस्थित होऊन दीप प्रज्वलन करुन रीतसर लोकार्पण झाल्याचे जाहीर करण्यात आले.आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले, क्षयरोग लाभार्थ्यांना किट वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाला पालकमंत्री बावनकुळे, आमदार डॉ आशिष देशमुख, खासदार शामकुमार बर्वे यांनी मार्गदर्शन केले.
आमदार डॉ.आशिष देशमुख हे जनतेसाठी अहोरात्र झटत आहे. २८८ आमदारांपैकी पहिल्या १० आमदारांमध्ये त्यांचे कार्य उत्तम आहे. आरोग्यसेवा ही सर्वात मोठी सेवा असून याचा लाभ गरजू रुग्णांना मिळणार आहे. या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या डॉक्टरांनी रुग्णांना सर्वोत्तम सेवा प्रदान कराव्यात, या ग्रामीण रुग्णालयाच्या विकासासाठी आणखी सव्वा करोड देत आहो असे वक्तव्य महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले. “या भागात दर्जेदार वैद्यकीय उपचार सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होणार आहे. सावनेर-कळमेश्वर क्षेत्रात निरंतर विकासकार्य आणि जनतेच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे. या क्षेत्रातील जनता व शेतकरी निरोगी राहावेत, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. पाटणसावंगीला आपण केंद्रबिंदू मानून या परिसराचा विकास करणार आहे.
ग्रामीण रुग्णालय असो, स्म्शाशन भूमी सौंदरीकरण असो, बाजारपेठ असो, गणेशमंदिर जीर्णोद्धार असो, विकासापासून कोसो दूर राहिलेल्या या परिसराचा आपण कायापलट करु. पाटणसावंगी ग्रामपंचायत सरपंचांनी नगरपंचायतचा ठराव दयावा, आपण नगरपंचायत बनवून अजून विकास करू तसेच रोजगारच्या संधी उपलब्ध करून देऊ. सावनेर विधानसभा क्षेत्राचा न भूतो, न भविष्यती विकास करू”, असे प्रतिपादन आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी मार्गदर्शन यावेळी केले. ग्रामीण रुग्णालय, पाटणसावंगी हे 30 खाटांनी सुसज्जित असे रुग्णालय असून येथे बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जनरल मेडिसिन विभाग, स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, अपघात विभाग, शस्त्रक्रियागृह, कुटुंब कल्याण, पॅथॉलॉजी, क्ष-किरण, लसीकरण, पट्टीबंधन अशा अनेक सुविधांचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. मंचकावर तहसीलदार अक्षय पोयाम, नागपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अशोक धोटे, अशोकराव इंगोले, माजी जि.प. सदस्य विजय देशमुख, किशोर चौधरी, सुरेंद्र शेंडे, मधु केदार, समीर उमप, प्रमोद पिंपळे, विलास महल्ले, चंद्रशेखर लांडे, राजू घुगल, आशिष फुटाणे, ज्ञानेश्वर गुडदे, उज्वल करडभाजणे, मंदार मंगळे, रामराव मोवाडे, रोहित मुसळे, विलास ठाकरे, शत्रुघन सावरकर, पंकज भोंगाडे, धनंजय मुसळे, अनंता पडाळ, प्रवीण बोबडे, रवींद्र हटकर, नितीन मोहगावकर, इमेश्ववर यावलकर, प्रदीप सातपुते आरोग्य कर्मचारी, इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निवृत्ती राठोड आभार प्रदर्शन डॉ. दानिश शेख यांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सोनसरे, प्रविण डोंगरे, शिल्पा खोरगडे, डॉ. दानिश शेख, डॉ राहूल पटले, डॉ तुषार खिरेकर, डॉ.अक्षय जुनघरे, डॉ. शुभम जयस्वाल, तेजस्विनी गाठे आदींनी प्रयत्न केले