शिव उद्योग संघटनेचे राज्य सचिव अधिकराव जगताप यांचा सातारा दौरा यशस्वी
अक्षराज : सुरेश संकपाळ
दि.१८, पाटण (सातारा) :
शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दिपक काळीद यांच्या सुचनेनुसार राज्य पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. संघटना सचिव अधिकराव जगताप यांचा नुकताच सातारा दौरा संपन्न झाला. यावेळी संघटनेचे सचिव अधिकराव जगताप ह्यांचे कराडात जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिव उद्योग संघटनेचे सातारा जिल्हा महिला प्रमुख किरण हादवे व कराड तालुका प्रमुख नितीन पाटील ह्यांनी ह्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद वेर्णेकर ह्यांची नियुक्ती करण्यात आली. तर सातारा जिल्हा संपर्कप्रमुख पदी शंकर पवार ह्यांची वर्णी लागली. हरी कुलकर्णी ह्यांची कराड ता.शिक्षण व आरोग्य समिती प्रमुख पदी, प्रिती दाभाडे पाटण ता.रोजगार समिती प्रमुख पदी, ज्योती जाधव यांची भोजन समिती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांमध्ये शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अक्षय मोहीते, कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने, कराड द.तालुकाध्यक्ष शैलेश आडके, कराड उत्तर प्रमुख राजु खराडे, कराड तालुका प्रमुख सुर्यकांत पाटील, तालुका उपप्रमुख हरी बल्लाळ, शाखा प्रमुख पवन ढगसाळे, राजु आलारकर, राजेंद्र रसाळ, शिव उद्योग संघटनेच्या पाटण तालुका महिला प्रमुख सुमन शेलार, वाई तालुका कला समिती प्रमुख सुवर्णा देशमुख ह्यांची विशेष उपस्थिती होती.