व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही संस्था-महाविद्यालयांनी अतिरीक्त फी मागितली तर तक्रार करा
महाराष्ट्र सिईटी सेल ने जारी केले परिपत्रक
अक्षराज : संगीता वनकळस
दि.१९, कळंब (धाराशिव) :
महाराष्ट्र सिईटी सेलच्या माध्यमातून तांत्रिक, अभियांत्रीकी, विधी, कृषी, व्हेटरनरी, वैद्यकीय, आयुष, तथा इतरही जवळपास सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीया चालू आहेत. काही अभ्यासक्रमांचे पहिले राऊंड होवून निवड याद्याही जाहीर झाल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही संस्था/महाविद्यालये विशेषतः वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयात अतिरिक्त फिसची मागणी सर्रासपणे होतानाच्या तसेच मुलींसह सर्वच प्रवर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना संपुर्ण शैक्षणिक शुल्कासह फिसची मागणी केली जात आहे. अशा विवीध स्वरूपाच्या अनेक तक्रारी शासनास प्राप्त होत आहेत.

याची गंभीर दखल शासनाने घेतली असून अशा संस्था व महाविद्यालयांना आता कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे येथील वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक तथा “होणाऱ्या डाॅक्टरांचे पालक संघ” महाराष्ट्र चे संयोजक संतोष भांडे यांनी सांगितले. नुकतेच महाराष्ट्र सिईटी सेल ने जारी केलेल्या परीपत्रकात या बाबतीत कडक निर्देश देण्यात आले आहेत. या परीपत्रकाद्वारे एक भ्रमणध्वनी क्र.७७००९१९८९४ तसेच https://portal.maharashtracet.org/ या लिंकवर आपल्या योग्य त्या पुराव्यासह तक्रारी पालक/विद्यार्थ्यांनी करण्याच्या सुचनांही देण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून तातडीने अशा संस्थांवर कडक कारवाई करणेत येणार असल्याचे,प्रस्तुत परीपत्रकात नमुद केले आहे. याबरोबरच या साईटवर किंवा थेट वर दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून बेधडकपणे तक्रार करण्याचे आवाहन ही महाराष्ट्र सिईटी सेल ने विद्यार्थी व पालकांना केले आहे.