श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा
अक्षराज : प्रतिनिधी
दि.२४, बुलडाणा : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथे दि. २३ रोजी आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. शाळेचे शारीरिक शिक्षक पाटील सर यांनी घेतलेल्या योगासनापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील कलाशिक्षक काळवाघे सर व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख हिंगे मॅडम यांच्या संकल्पनेतून व विद्यालयातील स्काऊट इन्चार्ज सावळे सर व गाईड इन्चार्ज पीवतकर मॅडम यांच्या मदतीने माती पासून पोळ्यासाठी बैलं व गणपती बनवणे स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे प्राचार्य कावरे सर व प्रमुख उपस्थितीमध्ये सुभाष देशमुख (कलाशिक्षक), शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक राजपूत सर,पंढरीनाथ वाघ सर, भोंडे सर, मांगे बाबूजी त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे छायाचित्रण वाघ सर, बनसोड सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ढोमणे सर यांनी केले. आभार प्रदर्शन बनसोड सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.