समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू
अक्षराज : सुनिल फर्डे
दि.१०, शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला MH 40 CM 4612 हा एक ट्रक बंद पडल्याने तो उभा होता. त्याचवेळी मुबंईच्या दिशेने मागून येणाऱ्या CG – 04 NW 7161 या ट्रक चालकाला अचानक झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.
दैनिक अक्षराज १० सप्टेंबर २०२५
पेपर येथे वाचा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/308/daily-aksharaj-10-september-2025
दरम्यान धडक देणाऱ्या ट्रकमधील लोखंडी सलाया ट्रकच्या पुढील भागात शिरले, ज्यामुळे ट्रक मधील चालक व क्लीनर दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलां आहे. सदर घटनेचा तपास शहापूर पोलीस करीत आहेत.
