चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण 

Spread the love

सर्य यंत्रणा सज्ज, १५ सप्टेबरपासून प्रत्यक्ष लसीकरण

राज्यातील काही जिल्ह्यातील आश्रमशाळांतील गेवर उद्रेक दिसून आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील गोवर रुबेला लसीकरणाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेबरपासून लसीकरण करण्यासाठी सुरवात होत आहे. जिल्ह्यातील एकूण ७६ अनुदानित आश्रम शाळेतील एकूण १६ हजार ५०५ बालकांना ५ वर्षे ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देऊन लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम १५ ते ३० सप्टेबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ५ ते १५ वर्षे वयोगटातील आश्रमशाळेतील मुलामुलींना लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. यात जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळेमध्ये आरोग्य संस्थांचे कर्मचारी मार्फत  लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम आरोग्य विभागासोबतच, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, महिला व बालविकास विभागाच्यै समन्वयाने राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेअंतर्गत ५ ते १५ वर्ष वयोगटातील ग्रामीण, शहरी, व कार्पोरेशन भागातील एकूण १६ हजार ५०५ बालकांना, एकूण १३३ लसीकरण सत्राचे आयोजन करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. 

या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.अशोक कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. महादेव चिंचोळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॅा. मोहनीश गिरी, वैद्यकीय अधिकारा डॅा.नयना उत्तरवार यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!