“दिवाळी धमाका खेळ उखाणा”ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.२०, येरवडा (पुणे) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘दिवाळी धमाका खेळ उखाणा’ हा महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. इच्छुक उमेदवार आरती ताई बाळू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमात पारंपरिक खेळ, उखाण्यांच्या स्पर्धा, प्रश्नोत्तरांचा फड तसेच दिवाळीशी संबंधित विविध उपक्रमांमुळे वातावरणात आनंद आणि हास्याचे सूर घुमले. महिलांनी आपल्या कलागुण, वक्तृत्व आणि विनोदबुद्धीचे दर्शन घडवत प्रेक्षकांची मने जिंकली.
या प्रसंगी विश्वास बाळासाहेब चव्हाण महाराष्ट्र शासन समाजभूषण राष्ट्रीय दलित पॅंथर पुणे शहराध्यक्ष अध्यक्ष उत्तम भाऊसाहेब अडसुळे, तसेच सतीश जगताप, सुरेश जाधव, संजय कांबळे, सुजल चव्हाण, मधु घोगरे आणि शुभम शेलार यांसारखे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाचे आणि महिलांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.
आरती ताई बाळू चव्हाण यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना आणि सामाजिक सहभागाला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला. उपस्थित महिलांनीही व्यक्त केले की, “अशा उपक्रमांमुळे आपुलकी, ऐक्य आणि स्त्रीशक्तीचा आत्मविश्वास अधिक दृढ होतो.” उत्साह, हशा आणि स्नेहभावनेने भारलेला ‘दिवाळी धमाका खेळ उखाणा’ हा उपक्रम प्रभाग क्रमांक २ मध्ये अविस्मरणीय ठरला.



