शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
अक्षराज : विनोद वास्कर
दि. १७, शिळफाटा (ठाणे) : दिवा प्रभाग समितीमध्ये येत असलेल्या शिळगावांमध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याच्या डस्टबिन ग्रामस्थांच्या घरी फुल झाल्या आहेत. तसेच रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोन लावले असता माहिती देतात की, डायघर येथील कचरा प्रकल्प बंद असल्यामुळे कचरा टाकणार कुठे ? असे उत्तर देऊन अधिकाराची सुद्धा हात वर करत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी कचरा प्रकल्प बंद केला आहे.
कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प होता. कचऱ्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी याच्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी विरोध करून हा प्रकल्प बंद केला आहे. ठाणे आयुक्तांनी लवकरात लवकर कचऱ्याचा विलेवाट लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात नाहीतर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास ठाणे आयुक्त या जबाबदार असतील असे नागरिक म्हणत आहेत. खरंतर ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, या सर्व विभागातून घंटा गाड्याय डायघर कचरा प्रकल्प या ठिकाणी टाकण्यासाठी आल्या होत्या. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिकाला दुर्गंधीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

आम्ही सुद्धा माणसे आहोत जनावरे नाही आहोत. आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. ठाणे आयुक्त जबरदस्ती करून आमच्या आरोग्यावर धोका का निर्माण करत आहे. या सर्व विभागातून कचरा जाणून-बुजून हाणून आमच्याकडे टाकण्याचा का? प्रयत्न करत आहे. सर्व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास नागरिकांची शरीराची हानी झाल्यास ठाणे आयुक्त जबाबदार राहणार आहे असे आरोप स्थानिक नागरिक आता करत आहेत.ठाणे आयुक्त आता कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय प्रयत्न करतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच गावोगावी घंटागाडी कधी सुरू होते याकडे लक्ष लागले आहे.



