देसाई गाव खाडी पुलाखालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले !
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२६, देसाईगांव (ठाणे) : देसाई गावच्या खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाचे गुढ उकळले असून घरातल्या भांडणावरुन आरोपीने गळा दाबून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीस २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, पोलीसांना नियंत्रण कक्ष, ठाणे येथुन प्राप्त झालेल्या संदेशानुसार देसाई गावाकडून कल्याणकडे जाणा-या रोडवर देसाई गावच्या पुढील खाडी ब्रिजच्या खाली एका बॅगेत अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याबाबत माहिती मिळुन आली होती. या प्रकरणी बीट मार्शल २ वरील अंमलदार यांनी खात्री करुन पोलीस ठाण्यात माहिती कळविली. लगेचच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांचेसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी भेट देवुन पाहणी केली असता तेथील खाडीच्या पाण्यातील मातीच्या भरावावर एक बॅग पडलेली दिसुन आली.
बॅगेत एका २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचे प्रेत पाय गुडघ्यात दुमडुन ट्रॉली बॅगत भरलेले व अर्धवट बाहेर आल्याचे दिसत होते. मयत महिलेचे अंगात नेसुस गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर नक्षीदार फुलांची डिझाईन, त्याखाली लाल रंगाची लेगीन्स घातलेली होती. तिचे डावे हाताचे मनगटाजवळ P.V.S. असे इंग्रजीमध्ये गोंदलेले नाव होते. तसेच प्रेत फुगलेले व अर्धवट कुजलेले होते. सदर मयत महिलेचे नातेवाईक मिळाले नव्हते. तसेच हा गुन्हा शिळ डायघर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीताविरुध्द दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पौळ यांनी मयताची ओळख पटवून आरोपीचा शोध तपासकामी अधिनस्त अधिकारी, अंमलदार यांचे चार तपास पथके तयार केले. गुन्हयाचा तपास चालू असताना सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर प्रसारीत केलेल्या बातमीद्वारे एका साक्षीदाराकडून अपर पोलीस आयुक्त श्री. विनायक देशमुख, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांना प्राप्त उपयुक्त माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीताबाबत सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या माध्यमातुन कसोशीने शोध घेतला. सदर गुन्हयात आरोपी विनोद श्रीनिवास विश्वकर्मा वय ५० वर्षे रा. ठि. देसाईगाव, ता. जि. ठाणे मुळगाव-गोरखपुर, उत्तरप्रदेश यास देसाई येथून ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली आहे.

सदर गुन्हयातील मयत मुलगी प्रियांका विश्वकर्मा वय २२ वर्षे ही आरोपीसोबत मागील ०५ वर्षापासुन राहावयास होती. त्या दोघांमध्ये दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्री आपसात भांडण झाले होते. आरोपी याने मयत महिलेचा गळा दाबुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने तिला ट्रॉली बॅगमध्ये भरुन ०१ दिवस रुममध्येच ठेवले होते. मयत महिलेच्या प्रेताची दुर्गंधी सुटल्यानंतर दिनांक २२ नोव्रोहेंबर रोजी रात्रौ ११.३० ते १२.०० वा. चे दरम्यान प्रेत असलेली ट्रॉलीबॅग रोडने पायी चालत खाडी पुलाकडे घेवुन जावुन सदरची ट्रॉलीबॅग पुलावरुन खाली फेकुन दिली होती. मयत व आरोपीताबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना सोशल मिडीयामध्ये प्रसारीत झालेल्या बातमीच्या आधारे साक्षीदार मिळवून, हददीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करुन सदर गुन्हयातील मयताची ओळख पटवून आरोपीस सदर गुन्हयात २४ तासात अटक करुन खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून स्तुत्य अशी कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी सुभाषचंद्र बुरसे, पोलीस उप आयुक्त परि. १ ठाणे, प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त परि. ५ वागळे इस्टेट, प्रिया डमाळे सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, श्रीराम पौळ, वपोनि शिळ-डायघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र राऊत, सपोनि. संतोष चव्हाण, सपोनि. अनिल राजपुत, सपोनि. योगश लामखडे, सपोनि. शहाजी शेळके, सपोनि. अमोल पोवार, पोउपनिरी. माने, पोउपनिरी. बेळगे, पोउपनिरी. तिडके, पोह. श्यामकुमार राठोड, पोह. हनुमंत मोरे, पोह. भरत जाधव, पोह. तेजस परब, पोह विश्वास मोटे, पोह. महेंद्र लिंगाळे, पोह. सचिन कोळी, पोह अजय साबळे, पोह. रमेश पाटील, पोह.विकांत कांबळे, पोना. मंदार यादव, पोना. महेंद्र पाटील, पोशि. संदीप बोरकर, पोशि. सुशिल पवार, पोशि. ललीत महाजन, पोशि. जयेश येळवे, पोशि. रत्नदिप चौधरी, पोशि. अक्षय पाडळे, पोशि. स्वप्निल सोनवलकर, पोशि.वाहीद तडवी, पोशि. विजय खाडे यांनी केली आहे.



