अक्षराज : विनोद वास्कर
दि.११,कल्याण (ठाणे) :
१४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या प्रचारार्थ डोंबिवली शहरातील एमआयडीसी विभागात प्रचार रॅली काढण्यात आली. चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे. जनतेने सुभाष भोईर यांना आशीर्वाद सुद्धा दिले . दुसऱ्यांदा तुम्ही निवडून याल तसे आश्वासन दिले .त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवली एमआयडीसी विभागातील गावदेवी मंदिर, सावरकर वाचनालय, कदम्ब सोसायटी, पाटील डेअरी, मॉडेल कॉलेज चौक, सिद्ध योगेश्वर सोसायटी, संदेश सोसायटी, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, कावेरी चौक, ममता हॉस्पिटल रस्ता, नवचैतन्य नगर, एम्स हॉस्पिटल रस्ता, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, सिस्टर निवेदिता शाळा, औदुंबर कट्टा, सुदर्शन नगर, आजदे गाव, आजदेपाडा, सागर्ली, आईस फॅक्टरी, मानपाडा रोड, संजय नगर, मोती नगर, सागाव परिसरातून शिवसेना शाखा सागाव येथे समाप्ती करण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, उपजिल्हाप्रमुख तात्या माने, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे, पूजा योगेश म्हात्रे, सुलोचना पवार, विजय भाने, विभाग प्रमुख अशोक पगारे, मंगेश गावडे, महिला उपविभाग प्रमुख श्वेता मयेकर, रजनी कुचे, महिला उपशाखा संघटक माया प्रताप, शाखाप्रमुख मंगेश सरमळकर, सागर पाटील, गणेश जेठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते