खंडाळा तालुक्यात मोठ्या संख्येने ६८ % मतदान

Spread the love


अक्षराज : सुहास महांगरे

दि.२०, शिरवळ : वाई विधानसभा मतदारसंघात वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीन तालुक्याचा समावेश असलेल्या खंडाळा मतदारसंघांमध्ये ६८ टक्के मतदान शांतते पार पडले या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद जाधव- पाटील आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यात सरळ लढत झाली. शिवसेना ( शिंदे गट ) अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या बंडखोरी केल्यामुळे निवडणुक चुरशीची झाली.

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाल्यानंतर सर्व पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता ठिकठिकाणी कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्यासाठी घेऊन येत होते. निवडणूक शांततेत पार पाडावी व जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. महायुतीचे उमेदवार आमदार मकरंद पाटील तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ,अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव व इतर उमेदवार यांनी काही मतदार केंद्रावर भेट देऊन मतदानाची माहिती घेतली. तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. यावेळी शिरवळ, पळशी , शिंदेवाडी, विंग, गुठाळे ,राजेवाडी, वडवाडी , हरतळी भाटघर तसेच पंचक्रोशी मध्ये तरुण वर्गाने आणि महिलांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे मतदान केले. शनिवार दिनांक 23 रोजी वाई औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामा मध्ये मतमोजणी होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान शांततेत पार पडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!