येळी येथे रेती चोरीवर संयुक्त कारवाई !

Spread the love


अक्षराज : साहेबराव गागलवाड
दि.२१ , नांदेड :
नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लश आउट अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दि.२० डिसेंबर रोजी उस्मान नगर हद्दीतील लोहा तालुक्यातील येळी येथे गोदावरी घाटावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती लोहा तहसीलदार यांना मिळाली असता पथकांसह तहसीलदार यांनी जाऊन त्या ठिकाणी धाड टाकून अनेक साहित्य जप्त करून नष्ट केले आहे.
उस्माननगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या येळी येथे नदीपात्रातून अवैधरित्या रेती चोरी सुरू होती. याबाबतची माहिती लोहा येथील तहसीलदार विठ्ठल परळीकर, उस्माननगरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांना मिळताच त्यांनी पोलीस प्रशासनासह व महसूल प्रशासन त्या ठिकाणी जाऊन दाड टाकली. या धाडीत १० तराफे २ बोट ४ इंजिन असा एकूण २५ लाख रुपयांचे साहित्य जाळून नष्ट केले आहे.


सविस्तर वृत्त असे की, येळी येथून अवैध रित्या रेतीची चोरी होत असून दररोज हजारो ब्रास रेती चोरी केली जात होती, याबाबतची तक्रार संबंधित तहसीलदार यांना व पोलिस प्रशासनाला गुप्त बातमी मिळाली. त्यावरून त्यांनी येळी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी तराफे इंजिन व बोट यांच्या साह्याने अवैध रेती उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी उस्मान नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या टीम सोबत धाड टाकली व १० तराफे २ बोट ४ इंजिन असा एकूण २५लाख रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आले असून महसूल विभागाकडून अहवाल व पंचनामा प्राप्त होताच महसूल पथकाच्या तक्रारीवरून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज  ठेवली आहे उस्मान नगर पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याने वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top