२० वर्षापेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणी रद्द करणे आवश्यक 

Spread the love

अक्षराज : जे के. पोळ 

दि.२१, ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयान्वये, २० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. तथापि अशी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जातात. अशा वाहनांमुळे अपघात होऊन रस्त्यावरील इतर वाहने तसेच प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होतो. नोंदणी वैधता संपलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येत असून ही वाहने जप्त करण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत सुरु आहे.

तरी २० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान होऊन नोंदणी वैधता संपलेल्या वाहनांच्या परवाना धारकांनी काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सी परवाना रद्द करून नवीन वाहन परवाना काढून घ्यावा. त्याचप्रमाणे काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एम-परिवहन ॲपचा वापर करून वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार वाहनांची नोंदणी वैधता / योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेली आढळून आल्यास अशा वाहनांतून प्रवास करू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top