हदगांव ते भानेगांव रोडचे काम अत्यंत संथ गतीने ! जीव मुठीत धरून करावा लागतो गावकऱ्यांना प्रवास

Spread the love


अक्षराज : चंद्रकांत भोरे
दि.२१, हदगांव (नांदेड) :

तालुका हदगांव पासून ९ कि.मी.अंतरावर भानेगाव हे गाव महामार्गापासुन जवळ असताना मुख्य रोड पासुन बऱ्याच दिवसांपासून रोड चे काम चालूं आहे. परंतु गुत्तेदाराच्या हलगर्जीपणा मुळे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

रस्त्यावर मोठी खडी, दोन्ही बाजूला अंथरून टाकली असुन यावरून पायी चालणे सुध्दा आवघड आहे. त्यावर दबई सुद्धा फिरवली नाही, मोठ्या प्रमाणात पाण्याचा फार मोठा अभाव आहे, बाकी तर सोडाच… संबंधित गुत्तेदार यांनी कोणत्या नियमानुसार हे रोडचे काम करीत आहे. हे समजण्यासाठी मार्ग नाही. संबंधित रोड हा डागडुजीचा आहे की रोड आहे हा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे. कारण जे जुना रोड आहे तो उखरणे ऐवजी त्याच्या आजूबाजूने मुरूम टाकून तसाच दाबून सोडलेला आहे. त्यामुळे भविष्यात हा रोड टिकेल किं नाही अशी शंका उद्भवत आहे?
पहीले एका बाजूने रस्ता प्रवासासाठी चांगला करायचा असताना सुद्धा त्यांनी दोन्ही बाजूने मोठी खडी रोडवर टाकून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आणला आहे. जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला संबंधित गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव जबाबदार राहील. असे गावकर्यात कुजबुज होत आहे.सदरील रस्त्यामुळे टू व्हीलर घसरून दररोज लहान, सहान अपघात होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव यांनी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top