विशेष अंमली पदार्थ पथक आणि रामनगर पोलीसांची धडक कारवाई

Spread the love

अक्षराज : विश्वनाथ शेनोय

दि.२८, कल्याण (ठाणे) : दि २८/०१/२०२५ रोजी विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक/प्रसाद चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीचे अनुषंगाने डोंबिवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे) /पंकज भालेराव, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. प्रशांत सरनाईक, पोशि निलेश पाटील, तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण यांचे पथकातील पो.उप निरी/ प्रसाद चव्हाण, पोशि राजेंद्र सोनवणे, पोना शांताराम कसबे, पोशि गौतम जाधव असे चोळेगांव तलाव, डोंबिवली पूर्व येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा लावुन थांबलेले असतांना, दुपारी १३:०५ वा. चोळेगांव तलाव, शिवमंदीराजवळ, डोंबिवली पुर्व येथे दोन इसम त्यांचे नांव १) सचिन रूलिया मोरे, वय २१ वर्षे, राह. ग्राम-मोहला, ता. सेंधवा, ठाणा-ग्रामीण, जि. बरवानी, राज्य-मध्यप्रदेश, २) संजु राजाराम लुहार, वय २४ वर्षे, राह. घर नं. ३, वॉर्ड नं.१, ग्राम-इनाहीकी, ता./ठाणा-वरला, जि. बरवानी, राज्य मध्यप्रदेश हे आले, त्यांना थांबवुन, त्यांचेकडील बॅगेची झाडती घेतली असता, सदरच्या दोन्ही इसमांचे ताब्यातील बॅगेमध्ये २२ किलो, ८८९ गॅम वजनाचा ४,५७,७८०/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला असुन, सदर आरोपीत यांना पंचासमक्ष ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यात मिळुन आलेला गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला असुन, त्याचेविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचे ताब्यात मिळुन आलेला गांजा अंमली पदार्थ हा त्याने कोठुन व कोणाकडुन आणला आहे, तसेच तो येथे कुणाला विक्री करणार आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक/अच्युत मुपडे, नेम. डोंबिवली पोलीस ठाणे हे करित आहेत.

डोंबिवली पोलीस स्टेशन व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण पथकाचे संयुक्तपणे दिनांक २७/०१/२०२५ रोजी व दि. २८/०१/२०२५ रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एकुण ५,९७,७८०/- रुपये किंमतीचा २९ कि. ९५५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला असुन एकुण ३ आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, ठाणे शहर, आशुतोष डुंबरे साो, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण ,अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण,अतुल झेंडे सुहास हेमाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, डोंबिवली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे / गणेश जवादवाड यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस स्टेशनचे पोनि (गुन्हे) / पंकज भालेराव, सपोनिरी/‌ईश्वर कोकरे यांचेसह पोहवा / प्रशांत सरनाईक, पोशि/मंगेश वीर, पोशि/ निलेश पाटील, तसेच परिमंडळ ३ कल्याण यांचे पथकातील पोउपनिरी/ प्रसाद चव्हाण, पोशि राजेंद्र सोनवणे, पोना शांताराम कसबे, पोशि गौतम जाधव यांनी केलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top