
माझे माहेर पंढरी…!
माझे माहेर पंढरी…! माहेराचं सुख सासुरवाशीणीला विचारा. विवाह नंतर कन्या जशी रक्षाबंधन भाऊबीजेच्या निमित्ताने माहेराला जाते. तिचा आनंद गगनात मावत नाही कारण त्या माहेरातच तिचं बालपण गेलेलं असतं. माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळून लहानाची मोठी झालेली असते. भावासोबत कधी खाऊ साठी भांडते तर, रुसलेल्या भावाला परत काहीतरी गंमत करून हसवते. बाल मैत्रिणींबरोबर खेळ खेळते. अंतर्मनातल्या…