देश विदेश

गुन्हेगारी, देश विदेश

पहलगाम अतिरेक्यांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील ३ पर्यटकांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर

अक्षराज : जे. के. पोळ

दि.२२, ठाणे : जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.
या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी. त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
दूरध्वनी क्रमांक:
०१९४-२४८३६५१
०१९४-२४५७५४३
व्हॉट्सॲप क्रमांक:
७७८०८०५१४४
७७८०९३८३९७
अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

गुन्हेगारी, देश विदेश

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी

जम्मू: काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्लेखोर दहशतवादी ८ ते १० च्या संख्येतील असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नाते विचारली आणि विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यात नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकान्याचाही मृत्यू झाला. दिल्ली मुंबईसह देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी घटनास्थळ व परिसराला घेराव घातला त दहशतवाद्यांचा कसून शोध सुरु केला. जखमींमध्ये महाराष्ट्रातील माणिक पाटील, रिनी पांडे, एस. बालचंद्र यांचा तसेच गुजरात, ओडिशा, कर्नाटक या राज्यांतील पर्यटकांचाही समावेश आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारत दौऱ्यावर आले असताना हा भ्याड हल्ला झाला. एका प्रत्यक्षदर्शींने सांगितले की, दहशतवाद्यांनी जवळून गोळीबार केला. एका पर्यटकाच्या डोक्यात गोळी लागल्याची माहिती त्याच्या पत्नीने एका वृत्तसंस्थेला दिली. बैसरन घाटी या उंचावरील ठिकाणाहून हेलिकॉप्टरने जखमींना पहलगामला आणण्यात आले. हशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी काश्मीर बैसरन घाटी भागात असलेल्या घटनास्थळाकडे धाव घेतली. (रोजारी) पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेली एक महिला. हे नवपरिणीत ओइपे हनिमूनसाठी आले होते.

पर्यटक जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले, नातेवाइकांनी मदतीसाठी फोडला हंबरडा

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जखमी व त्यांच्या नातेवाइकांनी मदतीसाठी हंबरडा फोडल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, काही पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अतिशय क्रूर पद्धतीने हा हल्ला करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. अंगलातून काही दहशतवादी आले व त्यांनी सुमारे ४० पर्यटकांना घेराव घालून अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराला सुरुवात होताच तिथे छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी पलायन केले. मात्र, पर्यटकांना निसटणे शक्य झाले नाही. या गोळीबारातून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, माझ्या नवन्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. तो विशिष्ट धर्माचा असल्यामुळे त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. त्यात अनेक लोक रक्तबंबाळ अवस्थेत अमिनीवर निपचित पडले आहेत. तसेच महिला पर्यटक हंबरडा फोडत त्याच्या आप्तजनांचा शोध घेताना दिसत होते. काही पर्यटक या हल्ल्यामुळे खूप हादरले होते व स्थानिक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते.

गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला; घेतली उच्चस्तरीय बैठक

पर्यटकांवर दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, शाह यांना तातडीने त्यांनी काश्मीरला जाण्यास सांगितले. गोळीबारानंतर त्या केंद्रशासित प्रदेशात उद्‌भवलेल्या परिस्थितीवर वरिष्ठ अधिका-यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर शाह यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली.

error: Content is protected !!
Scroll to Top