
धक्कादायक ! ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ बिस्किटात आढळल्या जिवंत अळ्या ! !
चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ, अन्नसुरक्षा विभागाकडे तक्रार दाखल! अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, हिमायतनगर (नांदेड) : हिमायतनगर शहरात आरोग्याला घातक ठरणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक किराणा दुकानातून खरेदी केलेल्या ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ बिस्किटाच्या पुड्यामध्ये जिवंत अळ्या निघाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बिस्किटाच्या पुड्यावर नोव्हेंबर २०२५ पर्यंतची एक्सपायरी डेट स्पष्टपणे नमूद असूनही त्यामध्ये अळ्या…