अंबाजोगाई – केज रोडवर भीषण अपघात
अक्षराज : शिवाजी औसेकर
दि .०२, अंबेजोगाई (बीड) : आज दि .०२, रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास आंबेजोगाईहून वीट घेऊन केजकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक एम. एच. २४ ए.यू ४०१६ या चारचाकी मालवाहक वाहनावर छत्रपती संभाजीनगर वरून एम. एच. १६ सी. डी. ९६०७ इलेक्ट्रिकल सामानाचे बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर लोखंडी सावरगाव कॉर्नर असलेल्या वळणावर बेल्ट तुटून गाडीतील बॉक्स चारचाकी मालवाहक अप्पेवर पडल्यामुळे ड्रायव्हर गंगाधर दगडू हिरवे वय ५७ वर्ष राहणार आंबेजोगाई हे जखमी झाले आहेत.

त्यांना ऊपचारासाठी आंबेजोगाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . सध्या क्रेनने गाडीवरील पडलेला बॉक्स हटवण्याचे काम चालू आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दैनिक अक्षराज ०२ जुलै २०२५ पेपर येथे वाचा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/240/daily-aksharaj-02-july-2025#