टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता
ग्रामस्थांच्या वतीने दररोज हजारो भाविकांना अन्नदान…
अक्षराज : वसंत रांधवण
दि.०५, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर गावचे ग्रामदैवत व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिराच्या प्रांगणात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम रोज रंगत असून, दररोज हजारो भाविकांची हजेरी लागत आहे. या हरिनाम सप्ताहाची सांगता आज रविवारी (दि.५ मे) कृष्णकृपांकित हभप विकासानंद महाराज मिसळ (पिंपळगाव वाघा) यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
काल्याचे किर्तन सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत होणार आहे. परिसरातील भाविकांनी धार्मिक कार्यक्रम, देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन दत्त सप्ताह कमेटी व भजनी मंडळ यांनी केले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवार दि. २८ एप्रिलला या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली होती. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासून पूर्वी काळापासून या अखंड हरिनाम सप्ताहाचे टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ आयोजन करत असतात. यामध्ये रोज पहाटे काकडा , सकाळी गाथा भजन, संध्याकाळी हरिपाठ, रात्री किर्तन, भोजन व त्यानंतर हरीजागर आदी धार्मिक कार्यक्रमाचाह समावेश आहे. या सप्ताहात हजारोच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या भाविकांना दररोज महाप्रसादाचे वाटप केले जात आहे.

या सप्ताहाची सुरुवात ह.भ.प. प्रसाद महाराज खिलारी (टाकळी ढोकेश्वर) यांच्या किर्तनेने झाली. तर सांगता हभप विकासानंद महाराज मिसळ यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. तर किर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य, सोवा सोसायटीचे चेअरमन व संचालक, भजनी मंडळ व ग्रामस्थ तसेच दत्त सप्ताह कमेटी परिश्रम घेत आहेत.