परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद

Spread the love

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद

अक्षराज : बालासाहेब फुलपगार
दि.११, पालम (परभणी) :
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रतिमा तोडून संविधानाची विटंबना व अवमान करणाऱ्या देशद्रोही आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणी साठी व सदरील घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पालम येथील आंबेडकर अनुयायीनी आज दि.११ डिसेंबर रोजी पालम शहर बंद चे अहवान केले होते या अहवानास शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत पालम शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.
या दरम्यान सदरील घटनेचा निषेध करण्यासाठी शहरासह तालुक्यातील आंबेडकर अनुयायी एकत्र जमून बौध्द विहारापासून तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढून संविधान बचाव संदर्भात घोषणा देत व आरोपीस कठोर शासन करावं या साठी आक्रोश दाखवत तहसीलदार यांना निवेदन दिले.


सदरील निवेदनात परभणी शहरातील मध्यवर्ती भागात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळील प्रतिकात्मक संविधान प्रतिमेची भर दिवसा तोडफोड,विटंबना करणे हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत दुःखद व अतिशय निंदनीय असून सदर घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र मद्यपानाच्या नावाखाली आरोपींना सहज व हलक्यात न घेता सदर राष्ट्रद्रोही कृत्य करण्यामागे आरोपीचा उद्देश काय आहे, याचा सर्वोच्च तपास होणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी करत, या सदर देशद्रोही घटनेच्या निषेधार्थ पालम शहर बंद ठेवण्यात येत असून तसेच यापुढे अशा राष्ट्रद्रोही घटनांना राज्यात व देशात आळा घालण्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी निवेदणाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी पालम शहरासह तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी आंबेडकर अनुयायी, बहुजन समाज बांधव, व महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.या दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top