विकलांग डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांची धडक कारवाई मोहीम
अक्षराज : विश्वनाथ शेनोय
दि.२२, कल्याण (ठाणे) : मध्य रेल्वे मुंबईहून येणाऱ्या गाडीमध्ये एका दिव्यांग महिलेला एका इसमानी मारहाण केल्या प्रकरणी लोहमार्ग डोंबिवली पोलीस ठाणे हे ॲक्शन मोडवर दिसून आले आहेत.
सध्या लोहमार्ग डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे दिव्यांग डब्यात बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या प्रवासांवर दिनांक २१ मे २०२५ रोजी डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे लोकल ट्रेन मधील सर्वसाधारण ३४ प्रवासी यांच्यावर डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे व रेल्वे सुरक्षा बल, डोंबिवली असे संयुक्तपणे कारवाई करण्यात आली आहे.

सदर या कारवाई मोहिमेत डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ०२ अधिकारी, २० अंमलदार तसेच रेल्वे सुरक्षा बल यांचे ०२ अधिकारी व ०५ अंमलदार हजर होते. डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत जानेवारी २०२५ ते मे २०२५ एकूण दिव्यांग डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या १९८ अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष किरण उंदरे यांनी दिली.
