शिळगावातील ठामपा शाळेत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी वणवण !

Spread the love

अक्षराज : प्रतिनिधी
दि.० ८, शिळफाटा (ठाणे)
: शिळगावातील शाळा क्रमांक ८१, शाळा क्रमांक २६ या दोन्ही शाळा एकाच इमारतीत सकाळ आणि दुपार अशा वेळी भरतात. या दोन्ही शाळेची पटसंख्या १ हजार २०० च्या वर असून सरासरी उपस्थिती ८७% असते. या दोन्ही शाळा ठाणे महानगरपालिकेच्या आहेत. मुख्याध्यापक यांनी निवेदन देऊन सुद्धा ठाणे मनपा पाणीपुरवठा अधिकारी या पत्राची दखल घेत नाही. विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही. विद्यार्थ्यांना आपली तहान भागवण्यासाठी घरून पाणी घेऊन जावे लागत आहे.

यासाठी शाळा क्रमांक ८१ चे गटप्रमुख अध्यक्ष उमाकांत कुडे सतत पाठपुरवठा सुद्धा करत आहे. तरीसुद्धा या पत्राची ती दखल घेत नव्हते. ही माहिती त्यांनी भारतीय जनता पार्टीचे कल्याण विधानसभा सुपर वारिर्यस विनोद वास्कर यांना दिली दिली. भारतीय जनता पार्टीचे कल्याण विधानसभा सुपर वारिर्सय विनोद वास्कर यांनी ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ पाणीपुरवठा अधिकारी विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला. तसेच सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असतात दोन्ही अधिकाऱ्यांनी लवकरच या पत्राची दखल घेऊन. शाळेला पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी उपाययोजना करू असे आश्वासन त्यांना देण्यात आला आहे. आता किती दिवसात अधिकारी दखल घेतात ते पाहायचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!