महिलेला अमानुष मारहाण ! गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.२२, नानापेठ (पुणे ) : समर्थ पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेला शेजारच्या एका महिलेकडून व तिच्या मुलाकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इतका गंभीर प्रकार घडूनही समर्थ पोलीस ठाण्याकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. केवळ ‘अ-दाखल पत्र’ देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हा प्रकार अत्यंत धक्कादायक व कायद्याच्या तत्त्वांना हरताळ फासणारा आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे माझी दखल घेतली जात नसल्याचे पीडित महिलेकडून सांगण्यात आले आहे.
मा. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, ही विनंती पीडित महिलेने पोलीस आयुक्तांना केली आहे.



