महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात संघटित लढ्याचा निर्धार !

Spread the love

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात संघटित लढ्याचा निर्धार !

अक्षराज : जे. के. पोळ
दि.१६, मुंबई :
मंत्रालयातील विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यालयात मंगेश भातुसे, चंदनजी शिरवाळे प्रमोद डोईफोडे तसेच आजी-माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकारांना जिवे मारण्याचे कट, तसेच पत्रकार संरक्षणाच्या दृष्टीने संघटितपणे लढा अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरात व्यापक जनजागृती आणि संघटनात्मक पातळीवर एकजूट निर्माण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

हे वाचले का ? 👇🏻👇🏻

महिला लोकशाही दिनाचे १८ मे रोजी आयोजन
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://aksharaj.in/महिला-लोकशाही-दिनाचे-१८-म

बैठकीत पत्रकारांवरील अन्याय आणि धमक्यांच्या घटनांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सर्व पत्रकार संघटनांनी एकत्रितपणे कार्य करावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष निलेश सोमाणी, महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश सदस्य खंडुराज गायकवाड, संजय फुलसुंदर तसेच दैनिक समर्थ गांवकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णु बुरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!