दिवाळीत ध्वनी व वायुप्रदूषण टाळा; उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा – मुख्याधिकारी युवराज पोळ

Spread the love

अक्षराज : बालासाहेब फुलपगार
दि. ०९, पालम ( परभणी ) :
प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असताना दिवाळी सण साजरा करताना ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करावी, असे आवाहन नगरपंचायत पालमचे मुख्याधिकारी युवराज पोळ यांनी केले आहे. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने जाहीर प्रसिद्धी करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्याबाबत विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक रस्ते, पदपथ, अरुंद रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालये, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि शांतता क्षेत्रांच्या परिसरात फटाके फोडण्यास विशेष प्रतिबंध घालण्यात आला आहे.


नागरिकांनी दिवाळी साजरी करताना ध्वनी व वायुप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडून इतरांना त्रास होईल असे कृत्य करू नये, असेही नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी नगरपंचायतीच्या हेल्पलाइन क्रमांक 02453-268077 / 94036-44786 या क्रमांकांवर किंवा nppalam@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील सर्व नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून शांततापूर्ण, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त वातावरणात दिवाळी साजरी करावी तसेच नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी युवराज पोळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!