पेरणे फाटा येथे वाहनांची धडक; तीन वाहनांचे मोठे नुकसान

Spread the love

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; वाहतूक काही काळ विस्कळीत

अक्षराज : प्रमोद दिवेकर

दि.२९, पेरणे फाटा (पुणे) : पुणे -अहिल्यानगर महामार्गावरील पेरणे फाटा येथील शिवगंगा भारत पेट्रोलियम पंपासमोर वाहनांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 12 WY 0027 क्रमांकाची टाटा हॅरिअर कार अचानक थांबल्याने तिच्या मागून वेगाने येणाऱ्या वाहनांना वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे मागून येणारी वाहने एकमेकांवर आदळली. धडकेमुळे तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पेरणे फाटा परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. अचानक वाहन थांबल्याने मागील वाहनांना ब्रेक लावण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वाळके व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!