Zepto फूड सप्लायर कंपनीला “मनसे” चा दणका..
अक्षराज : विनोद वास्कर
दि. २३, नवी मुंबई (ठाणे ) : ज्ञानेश्वर नावाच्या एका मराठी मुलाचा Zepto या कंपनी मध्ये गेल्या ३ महिन्यापासून पगार अडकला होता. आणि कंपनी पगार द्यायला टाळाटाळ करत होती. नवी मुंबईतील सर्व मनसे टीम त्या ठिकाणी पोचली आणि त्या मुलाचा पगार देण्याची मागणी केली असता मनसेला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मनसेने त्याची ब्रांच बंद करून सर्वांना बाहेर काढून टाकण्यात आल, आणि पूर्ण काम ऑर्डर बंद करण्यात आली.
तेव्हा कंपनीचे काही अधिकारी आले आणि शेवटी त्या मुलाचा जागेवर पूर्ण पगार मिळवून देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापे विभाग आणि कोपरी विभाग विनोद शिंदे, शाखा अध्यक्ष तुषार मराठे, शाखा अध्यक्ष सचिन कर्नाळे, अंकुश साहेब, उप शाखा अध्यक्ष ऋतिक लाड, समी गुप्ता आणि इतर महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.