नो-पार्किंगचा कहर — येरवड्याचा उमदा तरुण ठार
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.०५, कोरेगाव पार्क (पुणे) : ३ ऑगस्ट, पहाटे येरवड्यातील लक्ष्मी नगरात राहणारा हसतमुख, अभ्यासू आणि खेळाडू स्वभावाचा तरुण अजिंक्य राजू गायकवाड (वय २२) काल सकाळी आपल्या लाडक्या बहिणी अनुष्काला कॉलेजला सोडायला गेला. पण पुणे-सेंड मिरज कॉलेजजवळ नो-पार्किंगमधून वेगाने धावून आलेल्या बेदरकार चारचाकीने त्याच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा केला. धक्क्याची तीव्रता एवढी की अजिंक्य जागीच ठार झाला. तर त्याची बहीण अनुष्का रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही-
अपघाताचा जबाबदार आरोपीचा परिवार दहशतगिरीचा थरकाप उडवणारा खेळ सुरू करतो!
या प्रकरणात आरोपीच्या आईनेच पोलिसांना, नागरिकांना धक्काबुक्की केल्याची माहिती मिळत आहे. मृतकाच्या कुटुंबियांना उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हा केवळ बेफिकीर ड्रायव्हिंगचा प्रकार नाही तर हे कायद्याला, पोलिसांना आणि समाजाला थेट उघड आव्हान आहे असं समजावं लागेल.

स्थानिक नागरिक संतापले — “नो-पार्किंगच्या नावाखाली गुंडगिरी करणारे चारचाकीवाले रस्त्यावर मोकाट फिरतात. पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेतात. अजिंक्यासारख्या निष्पाप तरुणाचा बळी गेल्यानंतरही आरोपी मोकाट…. हे प्रशासनाचं उघड अपयश नाही का? असं बोलून नागरिक संतापाने व्यक्त होत आहेत.
येरवड्यात आज जनतेचा संताप उसळला आहे. स्थानिक नागरिकांची ठाम मागणी आहे कि, “बेपर्वा चालक व धमक्या देणाऱ्या आरोपीच्या घरच्यांना तात्काळ अटक करा! अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करू!”