बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले
अक्षराज : प्रतिनिधी
दि.०२, किनवट (नांदेड) : मांडवी मार्गावरील अंबाडी घाटात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात बोलेरो जीपचालक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी ६.३० च्या सुमारास घडली असून, बसमधील सर्व ३३ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किनवट आगाराची बस (क्रमांक एम.एच.१४ बि.टि.-२१०५) दि. १ जुलै रोजी सकाळी उनेकश्हरूहून मांडवी मार्गे किनवटकडे येत होती. अंबाडी घाटातील वळणावर समोरून भरधाव येणारी बोलेरो जीप बसच्या समोर आदळली. या जोरदार धडकेत बोलेरोचा चक्काचूर झाला, तर जीपचालक रमन्ना पप्पू (तेलंगणा) या ४२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

धडकेमुळे जीपचा स्टेअरींग आणि बसचा काही भाग अडकून चालक गंभीर जखमी झाला होता. तात्काळ उपचारासाठी त्याला आदिलाबाद (तेलंगणा) येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
(हे वाचले का ?) अंबाजोगाई – केज रोडवर भीषण अपघात
https://aksharaj.in/अंबाजोगाई-केज-रोडवर-भीषण
या अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या वाहनाने सुरक्षितपणे किनवट येथे रवाना करण्यात आले. अपघातस्थळी किनवट पोलिसांचे पथक पोहोचले असून, पोलीस निरीक्षक देविदास चौपडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार संग्राम मुंडे अधिक तपास करत आहेत.
दैनिक अक्षराज ०२ जुलै २०२५ पेपर येथे वाचा
https://epaper.aksharaj.in/view/240/daily-aksharaj-02-july-2025#
अंबाडी घाटातील वळणावर रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडांमुळे दृश्य अडथळा निर्माण झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.